पिंपरी चिंचवड शहराला जगाच्या पाठीवर सुंदर, विकसित, अत्याधुनिक आणि नियोजनबद्ध विकासाच्या वाटेवर चालणारे शहर अशी नवी ओळख निर्माण करण्यात सिंहाचा वाटा उचलणारे तसेच आपल्या चिंचवड मतदारसंघाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे हा ध्यास घेऊन अहोरात्र झटणारे, चिंचवड मतदारसंघातील आदराने घेतले जाणारे नाव म्हणजे चिंचवड विधानसभेचे विद्यमान आमदार श्री.लक्ष्मण पांडुरंग जगताप.
चिंचवड मतदारसंघाच्या राजकीय क्षेत्रातील एक अत्यंत शिस्तप्रिय, न्यायप्रिय व कुशल असे नेतृत्व ! तळागाळातल्या कार्यकर्त्यांशी असलेले व्यक्तिगत नाते, जनतेच्या प्रश्नांची अचूक जाण, दूरदर्शी, पारदर्शी आणि जनसामान्यांना आपले वाटणारे पथदर्शी असे नेतृत्व म्हणजे लक्ष्मण पांडुरंग जगताप.
चिंचवड मतदारसंघाच्या समाजकारणातील आणि राजकारणातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून श्री. लक्ष्मण जगताप हे परिचित आहेत. अचूक निर्णयक्षमता, विकासाचे राजकारण, सामर्थ्यवान आणि खंबीर नेतृत्व ही त्यांची प्रतिमा जनमानसात रूढ आहे. यासोबतच कला, क्रीडा आणि साहित्य यांची उत्तम जाण असलेले पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील नेतृत्व म्हणजे लक्ष्मण जगताप.
लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वात गेल्या २० वर्षात चिंचवड मतदारसंघाचा झालेला विकास हा राज्यात एक वेगळा आदर्श निर्माण करणारा ठरला आहे. राजकीय आयुष्य जगत असताना समाजकारणाला त्यांनी कधी अंतर दिले नाही. चिंचवड मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांना सोबत घेऊन मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्याचे काम आजवर केले आहे. चिंचवड मतदारसंघात केलेली मोठमोठी विकासकामे, विकासात्मक दूरदृष्टी, नाविन्यपूर्ण अत्याधुनिक सोयी सुविधा निर्माणासाठीचे त्यांचे प्रयत्न, लोकप्रश्नांची असलेली जाण,जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठीची त्यांची तळमळ व आग्रही भूमिका अशा विविध अंगभूत गुणांमुळे ते मतदारसंघाच्या विकासात नेहमीच अग्रस्थानी राहिले आहेत.
चिंचवड मतदारसंघाच्या विकासकामात, समाजकारणात आणि राजकारणात वेळोवेळी त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी अधिक सक्षमपणे सांभाळळ्या आहेत.अनेक आव्हानांना सामोरे जात आव्हानांना आव्हान देणारा आणि दिलेला शब्द पाळणारा असा खंबीर लोकनेता तसेच चिंचवड मतदारसंघा साठीची त्यांची विकासाभिमुख भूमिका यामुळे आमदार लक्ष्मण जगताप यांचे कर्तृत्व दिवसेंदिवस अधिकाधिक उजाळून निघते आहे.
भारतीय जनता पक्ष विविध माध्यमातून विकसित भारताच्या निर्माणासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. राष्ट्र निर्माणामध्ये प्रत्येक नागरिकांचा सहभाग असणे तेवढेच महत्त्वाचे आहे. राष्ट्रनिर्माणाचे हे अमूल्य कार्य साधण्यासाठी सर्व नागरिकांनी मिळून हातभार लावल्यास जगामध्ये भारत एक नवी महासत्ता म्हणून उदयास येऊ शकतो. आजवर भारतमातेच्या असंख्य सुपुत्रांनी भारताच्या निर्मितीमध्ये अनन्यसाधारण भूमिका निभावली आहे. आपल्या भारत देशाच्या सन्मानासाठी अविरतपणे कार्य करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे सदस्य होऊ... आधुनिक आणि विकसित राष्ट्र नव्याने घडवू.
आजच आपला सदस्य नोंदणी अर्ज भरा.
चिंचवड मतदारसंघाच्या मागील अनेक वर्षाच्या सामाजिक क्षेत्रात कार्य करत असताना नागरिकांच्या सोयीसाठी अनेक योजना राबवण्यासाठी मी सुरवातीपासूनच आग्रही राहिलो. या शहरातील पायाभूत सोयी सुविधांपासून अत्याधुनिक शहर विकासाच्या संकल्पना राबवताना काळानुसार आणि गरजेनुसार अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवले गेले.
बी.आर.टी.एस व उड्डाणपूल निर्माण
पिंपरी चिंचवड शहरातील उद्योगनगरी तसेच हिंजेवडी, तळवडे परिसरातील आयटी कंपन्यांच्या कार्यालयामुळे येथे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला. परिणामी मोठ्या प्रमाणात नोकरदार वर्ग या भागातून प्रवास करू लागला. त्यामुळे उपलब्ध असलेले रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात ताण येत होता तो कमी करण्यासाठी तसेच या विभागाची गरज आणि महत्त्व ओळखून गतिमान वाहतूकीसाठी प्रशस्त रस्ते आणि अनेक ठिकाणी उड्डाण पुलांची आवश्यकता होती. हि गरज ध्यानात घेवून आम्ही पिंपरी चिंचवड शहरात अनेक ठिकाणी ग्रेड सेपरेटर व उड्डाणपुलांची निर्मिती केली. शिवाय या भागात येणाऱ्या नोकरदार वर्ग आणि नागरिकांसाठी बीआरटीएस या अत्याधुनिक बसप्रणालीची सुरुवात करून येथील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी आग्रहाने प्रयत्न केले.
नवीन उद्यान निर्माण व विकास
मागील दहा वर्षात पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या अनेकपटींनी वाढली. आजकालच्या धकाधकीच्या दैनंदिन व्यापातून थोडासा फावला वेळ नागरिकांना निवांतपणाने कुटुंबीयांबरोबर घालवता यावा, मुलांना खेळणी बागडण्यासाठी तसेच जेष्ठांना विरुंगुळासाठी आपल्या भागात बाग - बगीचे असावेत हि संकल्पना घेऊन चिंचवड मतदारसंघातील अनेक भागात अत्याधुनिक आणि मनाला विसावा मिळेल अशी उद्याने निर्मितीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून आम्ही पिंपळे गुरव येथील डायनासोर गार्डन, जिजामाता गार्डन, लिनियर पार्क, गणेश तलाव येथील गार्डन असे अनेक छोटेमोठे उद्याने विकसित केली आहेत.
घरकुल योजना, शाळा, हॉस्पिटल व पुतळा निर्माण
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून चिंचवड मतदारसंघातील विविध भागात १० ठिकाणी घरकुलांची निर्मिती करण्याचा संकल्प हाती घेतला आहे. या योजनेतून जवळपास ९ हजार ४५८ घरे बांधण्यात येणार आहेत. चिंचवड मतदारसंघाच्या अनेक भागात विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अत्याधुनिक शाळांची उपलब्धता असावी याकरीता शाळेच्या नवीन इमारतीची उभारणी केली जात आहे. पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी अत्याधुनिक सोयी सुविधायुक्त्त रुग्णालयांची उभारणी करण्यासाठी माझा कटाक्ष राहिला आहे. शहराच्या सौंदर्यात भर घालणारे अनेक कलात्मक प्रकल्प असणे गरजेचे असते त्यानुसार आम्ही शहर सुशोभीकरणाचे अनेक कलात्मक आणि सौंदर्यत्मक प्रकल्प पूर्णत्वास घेऊन जात आहोत. समाजासाठी आपले आयुष्य व्यतीत केलेल्या अनेक महापुरुषांचे पुतळे तसेच तेथील सुशोभीकरण या माध्यमातून करण्यात येत आहे.
उद्योगनगरी ते अत्याधुनिक विकसित मेट्रोसिटी अशी आपल्या पिंपरी चिंचवड शहराच्या निर्मितीमध्ये मी आजवर केलेल्या कार्याची दाखल अनेक वृत्तपत्रांनी आणि अत्याधुनिक प्रसारमाध्यमांनी घेतली त्याचा हा थोडक्यात घेतलेला आढावा.
आमदार जगताप लक्ष्मण पांडुरंग
जगताप पाटील कॉम्प्लेक्स, शिवाजी चौक, पिंपळे गुरव, पुणे - ४११०६१.
ई-मेल : jagtaplaxman1@gmail.com
फोन नं. : 020 2720 3232
© 2022, जगताप लक्ष्मण पांडुरंग.